ताज्या घडामोडी

विजेच्या धक्क्याने पिंपळोलीत एकाचा मृत्यू

मावळ : मावळ तालुक्यातील पिंपळोली या गावात विद्युत वाहक तारेचा धक्का बसल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 3 डिसेंबर) रोजी घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिंपळोलीमध्ये ग्रामदैवत उत्सवानिमित्त भारूडाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या मंडप स्पीकरची व्यवस्था करताना मंडप व्यवसायीक ज्ञानदेव मालपोटे यांचा विद्युत वाहक तारेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!