ताज्या घडामोडी
महाराष्ट्रात ओमिक्रोनचा पहिला रुग्ण कल्याण – डोंबिवली मध्ये
मुंबई : महाराष्ट्रात ओमिक्रोनचा पहिला रुग्ण कल्याण-डोंबिवली मध्ये सापडला आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईत आलेल्या तरुणामध्ये ओमिक्रोन व्हेरीयंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे.
हा तरुण कल्याण – डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असून त्यांने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. 24 नोव्हेंबर रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला. इतर कोणतीही लक्षणे आढळली नाही. त्यामुळे या रुग्णाचा आजार सौम्य स्वरूपाचा असून सध्या तो कल्याण डोंबिवली येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहे.