भजनसम्राट मावळभूषण नंदकुमार शेटे यांना लोणावळा नगरपरिषदेच्यावतीने पुरस्कार प्रदान
लोणावळा : प्रसिद्ध गायक व साम टीव्ही , शेमारू मराठी , झीटाॕकीज आदी वाहिनीवरून कीर्तनात चाल देणारे गायक भजनसम्राट नंदकुमार दत्तोबा शेटे महाराज आणि उत्कृष्ट गायिका आशाताई नंदकुमार शेटे यांचा केंद्रीय सामाजिक न्यायमंञी रामदासजी आठवले यांचे प्रमुख उपस्थितीमधे लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यांचे हस्ते मानाचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा सुशोभिकरणाचे भूमिपूजन व माता रमाई भिमराव आंबेडकर महिला सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन आठवले यांचे हस्ते झाले. यावेळी झालेल्या शानदार कार्यक्रमात लोणावळ्याचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष दिलीप दामोदरे , माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिर्के , संजय घोणे,राजूशेठ बच्चे, माजी उपनगराध्यक्षा संध्या खंडेलवाल , सुवर्णा आकोलकर , आरोग्य समिती सभापती रचना सिनकर, तसेच आर पी आय चे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे , नगरसेविका , आपर्णा बुटाला , गौरी मावकर , सभापती मंदा सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यापूर्वी ह.भ.प.श्री .नंदकुमार शेटे यांनी अनेक भजनस्पर्धेत प्रथम व दुसरा क्रमांक मिळवून शेटेवाडी व मावळ तालुक्याचे नाव राज्यात पोहोचवले आहे. त्यांना नुकताच भजनसिंगर हा आर्टबिटस् फौडेशन , पुणे , यांचा पुरस्कार राज्याचे मंञी यांचे हस्ते मिळाला आहे. कलाश्री सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचा भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांचेतर्फे वैयक्तिक सन्मान करण्यात आला आहे. भजनसम्राट नंदकुमार शेटे महाराज हे अनेक पुरस्काराचे मानकरी असल्यामुळे त्यांचा लोणावळ्याचे नगरपरिषदेच्या वतीने गौरव करण्यात आला आहे.