ताज्या घडामोडी

कर्तव्यदक्ष व कार्यसक्षम पोलिस अधिकारी विशाल गजरमल यांनी स्वतः उभे राहून बुजवले खड्डे

तळेगाव : तळेगाव – चाकण महामार्गावरील खड्डे हे तसे तळेगावकरांसाठी आणि या महामार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी नित्याचे. या खड्ड्यात गाड्या आदळून झालेला त्रास सहन करत नागरिक या रस्त्यावरून ये-जा करतात. मात्र याचे काहीही सोयरसुतक सार्वजनिक बांधकाम विभागाला नाही.

वर्षभरापूर्वी 12 डिसेंबर 2020 रोजी तळेगाव चाकण कृती समितीच्या पुढाकाराने सार्वजनिक बांधकाम विभाग, आय. आर. बी. व संबंधित इतर विभागातील अधिकारी यांनी या रस्त्याची पाहणी केली. या पाहणीनंतर रस्त्याचे रुंदीकरण, रस्त्यावरील झाडांची छाटणी, स्पीड ब्रेकरची योग्य उंची, अतिक्रमण हटवणे, योग्य ठिकाणी सुचना फलक लावणे यासारख्या ढीगभर कामांची यादी तयार करण्यात आली. मात्र वर्ष उलटून गेल तरी त्याची पुर्तता झालेली नाही. प्रशासन ढिम्मच आहे.

या रोडवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. तरीही यावर कोणतीही उपाययोजना संबंधित खात्याकडून होत नाही. नाहक नागरिकांचा यामुळे बळी जात आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम खात्याला याबाबत जाग येत नाही हे दुर्दैव आहे.

परंतु नव्याने बदली झालेल्या वाहतूक शाखेचे सपोनि विशाल गजरमल व वाहतूक अंमलदार सुरेश ढवळे यांनी याची दखल घेत स्वतः दिवसभर उन्हात उभे राहून वडगाव फाटा ते देहू पर्यंत खड्डे दुरुस्तीचे काम करून घेतले. पीडब्ल्यूडी कडून त्यांना साहित्य पुरवण्यात आले होते. भर दुपारी रणरणत्या उन्हात अधिकाऱ्यांनी समक्ष उभे राहून प्रत्येक खड्डा जातीने भरून घेतला. या कर्तव्यदक्ष सक्षम अधिकाऱ्यांचे तळेगावकर नागरिक भरभरून कौतुक करत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!