ताज्या घडामोडी

प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने खेडमध्ये रास्तारोको

खेड : राज्यमंत्री  बच्चु कडू  प्रणित प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने  महाराष्ट्र राज्य महिला प्रदेशाध्यक्षा सुरेखा ताई ढवळे यांच्या नेतृत्वाखाली १० डिसेंबर रोजी खेड तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात  तालुक्यातील असंख्य दिव्यांग बांधव सहभागी झाले होते. दि.१०डिसेंबर रोजी प्रहार अपंग क्रांती आंदोलन खेड तालुका यांच्या वतीने जागतिक अपंग दिनानिमित्त पंचायत समिती खेड येथे खेड तालुक्यातील दिव्यांगांकडुन पंचायत समिती खेड आणि तहसीलदार कार्यालय यांचा रक्तदान करून निषेध केला आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.तसेच बीडीओ साहेब यांची खुर्ची रस्त्यावर ठेवून हार घालून निषेध करण्यात आला.


याप्रसंगी प्रहार अपंग क्रांती आंदोलन खेड तालुका अध्यक्ष  जिवन टोपे, उपाध्यक्ष राजेन्द्र सुपेकर, सचिव शिवव्याख्याते संदीप बारणे, प्रहार महिला अध्यक्षा अर्चना घुंडरे, विजय पगडे, मच्छिंद्र धनवे,  अमित लोणारी,  नवनाथ वर्पे,  संजय मोरे, आनंद बनसोडे, शेखर मंडलिक, जान्हवी बोञे, प्रहार अपंग क्रांती आंदोलन आंबेगाव तालुका अध्यक्ष  सुनील दरेकर,  समिर टाव्हरे,  बाळासाहेब तरस यांनी नेतृत्व करून तालुक्यातील दिव्यांगांच्या अडचणी सोडविण्या बाबत दोन तास रास्तारोको आंदोलन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!