सामाजिक कार्यकर्ते तानाजी काळभोर कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित
चिंचवड : येथील सामाजिक कार्यकर्ते तानाजी काळभोर यांना आज आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे बंधू उद्योजक शंकरशेठ जगताप यांचे हस्ते कोरोना योद्धा पुरस्काराने व शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे वडील कै.पांडुरंग खंडुजी जगताप व मातोश्री कै.चंद्रभागा पांडुरंग जगताप यांच्या स्मरणार्थ कासारवाडी येथे सुरू असलेल्या श्री दत्त जयंतीनिमित्त कीर्तन महोत्सवाचा आज पहिला दिवस होता.
यावेळी ह.भ.प.महेश महाराज माकणीकर यांचे कीर्तन झाल्यानंतर कोरोना काळात पिंपरी-चिंचवड शहरातील काही डाॅ. आणि काही सामाजिक कार्यकर्ते याचा “कोरोना योद्धा “म्हणून सन्मानित करण्यात आले.
यावेळी निगडी भागातून काळभोर यांचा सन्मान ह.भ.प.शास्त्री महाराज तसेच संत तुकाराम स.सा.का. संचालक बाळासाहेब विनोदे , माजी नगरसेवक आप्पासाहेब बागल,सामाजिक कार्यकर्ते सुधीरराव ढगे व किसनराव करदोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.