ताज्या घडामोडी

रूक्मिणीबाई नाणेकर यांचे निधन

लोणावळा : औंढे खुर्द गावातील जेष्ठ महिला श्रीमती रूक्मिणीबाई बळवंत नाणेकर (वय-९५) यांचे वृध्दापकाळाने ता.११ रोजी निधन झाले.

त्यांचे पश्चात एक विवाहित मुलगा , चार विवाहित मुली , सून , जावई , नातवंडे , पतवंडे असा परिवार आहे.

प्रगतीशील शेतकरी व रेल्वेचे सेवानिवृत्त कर्मचारी किसन बळवंत नाणेकर हे त्यांचे सुपुञ होत. औंढे खुर्द ग्रूप ग्रामपंचायतीचे सदस्य व माजी उपसरपंच निलेश किसन नाणेकर हे त्यांचे नातू होत.

सद्गुरू च्या बैठकीत असणाऱ्या कै.श्रीमती .नाणेकर आणि सर्व नाणेकर कुटूंबाने बोरवेलच्या पाण्यावर त्यांनी शेतात पाॕलिहाऊस मधे जरबेरा व गुलाबाच्या फुलांचे उत्पादक व मशरूम चे उत्पादन घेवून पंचक्रोशित आगळावेगळा ठसा उमटवला होता.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!