ताज्या घडामोडी

लोणावळा येथील मनशक्ती केंद्राच्या दत्तकुटीर मध्ये सेवा संस्कार उपक्रमाचा शुभारंभ

लोणावळा : मनशक्ती केंद्राचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांनी लोणावळा येथील दत्तकुटीर मध्ये तब्बल 600 दिवस तपश्चर्या केली. तसेच विज्ञाननिष्ठ प्रयोग केले. या वास्तूत काल गीता जयंती व मोक्षदा एकादशीचे औचित्य साधत सेवा संस्कार उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

या कार्यक्रमाची सुरुवात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, नगराध्यक्ष सुरेखा जाधव, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, वरसोली सरपंच सारिका खांडेभराड यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. तर बाळा भेगडे यांनी डिजिटल पद्धतीने सेवा संस्कार उपक्रमाचे उद्घाटन केले.

या उपक्रमाअंतर्गत दत्तकुटीर येथे बाल संस्कार वर्ग, युवकांसाठी स्पोकन इंग्लिश व गीता अभ्यासवर्ग घेतले जातील. तसेच मनशक्तीच्या वतीने वैद्यकीय सेवा देण्यात येईल.

यावेळी बोलताना मा. राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले,सुख शांती समाधान मनशक्ती मध्ये मिळते.आज गीता जयंती निमित्ताने हा कार्यक्रम होत आहे.हे भाग्य आहे.स्वामींजीनी तत्वज्ञान माध्यमातून समाजावर संस्कार केले. आजचा कार्यक्रम वेगळी अनुभूती आहे. बदलता काळ पहातां जीवन शैली कशी असावी हे येथे समजते. मनशक्तीच्या वटवृक्षाची सावली अनेकांना प्रेरणा देणारी ठरेल.

नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी मनावरील संस्कारांचे मोठे काम स्वामीजींनी केले आहे. मानव कल्याण मंत्र त्यांनी दिला. समाज घडविण्याचे महान काम मनशक्ती करीत आहे.या शब्दात भावना व्यक्त केल्या.

तर ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांनी  मनशक्ती हे ऊर्जा केंद्र आहे.स्वामीजींचे अस्तित्व येथे जाणवते. हे गुरुचे साधना स्थळ आहे. मन पवित्र ठेवण्याकरिता मनशक्ती मोठे कार्य करीत आहेत. स्वामीजींच्या समाधी नंतर खचून न जाता.साधकांनी खूप मोठा विस्तार केला. सर्वांगीण ,राष्ट्रकल्याण, विश्व कल्याण, व्यक्तिकल्याण द्वारे स्वामीजी व मनशक्तीने आसेतु हिमाचल काम केले आहे. गीता जयंतीच्या दिवशी पुन्हा उपक्रम सुरु होतोय ही भाग्याची गोष्ट आहे. स्वामीजी मन स्वच्छ ठेवण्याच काम करत आहेत.स्वामीजीच संपूर्ण आयुष्य म्हणजेच सेवा व संस्कार आहे. स्वामीजींनी 50 वर्षापूर्वी राष्ट्र कल्याणाची प्रार्थना सांगितली. त्यांनी कायम सर्वांशी मित्रत्वाच नात ठेवलं.मनशक्ती हे एक उर्जाकेंद्र आहे.येथून नवी प्रेरणा संपूर्ण जगाला मिळत आहे.स्वामीजींनी समाजासाठी आयुष्य समर्पित केल.या भूमीत येण हा माझ्यासाठी प्रसादच आहे अश्या शब्दात  मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास लोणावळ्याचे उपनगराध्यक्ष दिलीप दामोदरे, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी,लोणावळा विभाग पोलिस अधिकारी राजेंद्र पाटील, मनशक्ती केंद्राचे कार्यकारी विश्वस्त प्रमोदभाई शिंदे, व्यवस्थापकीय विश्वस्त गजानन केळकर,प्रल्हाद बापर्डेकर,प्रज्ञाताई केळकर, सुरेश साखवळकर, दीपक गांगुली, दत्तात्रय पाळेकर, नगरसेवक राजू बच्चे, संजय घोणे,  ब्रिंदा गणात्रा  यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!