ताज्या घडामोडी

क्रांतीवीर वसंतराव नाईक यांची जयंती व पुण्यतिथी साजरी

आवाज न्यूज : क्रांतीवीर वसंतराव नाईक यांची १३ डिसेंबर रोजी जयंती व १४ डिसेंबर रोजी पुण्यतिथी राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओ.बी.सी.सेल च्या वतीने संयुक्तपणे साजरी करण्यात आली.

यावेळी नेहरुगार्डन,शालिमार येथील पुतळ्यास राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओ.बी.सी.सेल चे शहराध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड तसेच के.व्ही.एन.नाईक शिक्षण संस्थेचे मा.उपाध्यक्ष प्रभाकररावजी धाञक यांच्या हस्ते  पुष्पहार घालून साजरी करण्यात आली.

सर्वसामान्यांच्या जीवन वाटा प्रकाशमान करण्यासाठी क्रांतिवीरांनी आपले आयुष्य खर्ची केले.अनेक भुमिगत चळवळींमधे भाग घेऊन स्वतंञ्य चळवळी मधे स्वतः ला वाहून घेतले. सर्वसामान्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी परिवहन महामंडळामधे मोठ्या प्रमाणात भरती करुन रोजगार उपलब्ध करुन दिला.

आपल्याकडील कर्ज सुट देऊन अनेकांना कर्जाच्या जाचातून मुक्त केले. सर्वसामान्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचावी यासाठी अहोराञ प्रयत्न केले. अशा या महामानवाचे विचार तळागाळात पहोचविण्यासाठी प्रयत्न करायला हवे असे प्रतिपादन ॲड.सुरेश आव्हाड यांनी केले.

यावेळी प्रभाकर धाञक,मनोहर खेडकर,अंतोष धाञक,भास्कर धुमाळ,बापू जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!