ताज्या घडामोडी

हेलिकॉप्टर दुर्घटनेतील भारतीय सैन्यदलातील  हुतात्म्यांना तळेगावकरांनी वाहिली श्रद्धांजली  

तळेगाव : दुर्दैवी हेलिकॅाप्टर अपघातात भारतीय सैन्यदल प्रमुख स्व.बीपीनजी रावत आणि त्यांच्यासमवेत निधन पावलेल्या लष्कर अधिकारी यांना तळेगाव दाभाडे मध्ये सार्वजनिक श्रद्धांजली अर्पण केली गेली.

तळेगाव दाभाडे येथील छत्रपती श्री शिवशंभु स्मारक समिती, विश्व हिंदु परीषद – बजरंग दल, पूजनीय श्री गुरूजी न्यास आणी वन्यजीव रक्षक यांच्या संयुक्त नियोजनातून श्रद्धांजली तथा कृतज्ञता अर्पण सभेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर श्रद्धांजली सभा हि तळेगांव नगरीच्या केंद्रस्थानी असलेल्या छत्रपती श्री शिवशंभु स्मारकाच्या नियोजित जागेत सायं सात ते साडेआठ या वेळेत पार पडली.

कार्यक्रमासाठी विशेष उपस्थितीत हुतात्मा बिपिनजी रावत यांच्या परिवारातील डॅा रामसिंहजी रावत व तळेगांवचे सुपुत्र नि. लेफ्टनंट कर्नल हृषीकेश खांडगे उपस्थित होते. समवेत नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे नगरसेवक संतोष हरीभाऊ दाभाडे जनसेवा विकास समितीचे प्रमुख किशोरभाऊ आवारे मा. नगराध्यक्ष रविंद्रनाथ दाभाडे मा. नगरसेवक गिरीषतात्या खेर, सुरेश दाभाडे राष्ट्रवादी कॅांग्रेस कामगार आघाडिचे प्रमुख विजयराव काळोखे, रा स्व संघाचे हेमंत दाभाडे, भा. मजदूर संघाचे अजित शेलार, निलेश भेगडे, भा ज यु मो चे अक्षय भेगडे यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.

प्रमुख वक्ते श्री प्रशांत दिवेकर यांनी भाषणात हुतात्मा वीरांचा कार्यपरीचय देत सैन्यदल, त्यांचे परिजन यांप्रति उर्वरित समाजाकडून आवश्यक कृतज्ञतापूर्ण कृती यांची आवश्यकता व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक न्यासाचे रमेश लोणकर यांनी केले, सुत्रसंचलन गणेश निसाळ, उपस्थितांचा परीचय विश्व हिंदु परीषद मंत्री कपिल देवाडिगा यांनी तर बजरंग दल संयोजक ओंकार भेगडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

श्रद्धांजली सभेचे प्रमुख संयोजन स्मारक समितीचे संतोष भेगडे पाटील, प्रसाद कुऱ्हे व वन्यजीव रक्षक चे निलेश गराडे यांनी केले.सामूहिक श्रद्धांजली सह संपूर्ण वंदे मातरम या राष्ट्रगीत गायनातून सभेची सांगतां झाली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!