ताज्या घडामोडी

भारतीय सैन्यदलांचे सीडीएस शहीद बीपीन रावत व आधिकारी यांना लोणावळ्याच्या विशेष सभेमध्ये श्रध्दांजली

सभेमधे २८ विषय मंजूर ;तर तीन विषय वगळले

लोणावळा : लोणावळ्याच्या विशेष सभेमधे २८ विषय मंजूर ;तर तीन विषय वगळले. तसेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे पुतळ्याचा विषय मंजूर करण्यात आला. लोणावळा नगरपरिषदेच्या विशेष सभेमधे भारताचे संरक्षण दलाचे सी.डी.एस बीपीन रावत व सैन्यदलातील अधिकारी व सैनिक यांच्या हॕलिकॕप्टरला झालेल्या अपघाती निधनाबद्दल त्यांना लोणावळा नगरपरिषदेच्या सभागृहात श्रध्दांजली वाहण्यात आली.

या सभेत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे पुतळ्यास नगरपरिषद आवारात बसविण्याचा ठराव जिल्हाधिकारी यांच्या ७/१२/२०२१ च्या पञाचा विचार करून मंजूर करण्यात आला. गावठाण येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक बोभाटे यांच्या पाठपुराव्यास यश आले. लोणावळा नगरपरिषदेच्या विशेष सभेमधे जयपूर येथे नगरसेवक व नगरसेविका यांच्या प्रशिक्षण शिबिराचे शुल्क भरण्यासाठीचा ठराव मंजुर करण्यात आला.

नगरपरिषदेच्या तीन वर्षात झालेल्या कामांचे ठेकेदार यांच्या आनामत रकमा परत देण्यास मंजुरी देण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मधे नगरपरिषदेला देशात दुसरा क्रमांक मिळाला.त्याबाबत शहर समन्वयक म्हणून कार्यरत आसलेले अक्षय शिवाजी पाटील ,यांच्या आर्जावर चर्चा झाली. वलवण ते नांगरगाव रस्त्याच्या बाजूला आर सी सी गटर बांधण्यासाठी मंजूरी देण्यात आली. नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाकडै प्राप्त तांत्रिक रकमेबाबत मंजुरी देण्यात आली.रेल्वे गेट क्रमांक ३० येथे उड्डाणापूल कामाकरीता जागा संपादन करणे करीता मंजुरी देण्यात आली.वरसोली कचराडेपो येथे विविध कामाकरीता आंदाजपञकास मंजुरी देण्यात आली.जुन्या भुयारी मार्गाच्या वाढीव खर्चास व कामांस मंजुरी देण्यात आली.डोंगरगाव येथील मैलाशुध्दीकरण केंद्राला आर सी सी भिंत बांधणे करीता चर्चा झाली.

नगरपरिषदेच्या कागदपत्रे डिजिटायजेशन कामांचे मे.आर्यन , इमाॕजिन ,पुणे यांचे बील अदा करण्यास मंजूरी देण्यात आली. पी.टी.एस.खंडाळा येथे पीटीएस जवळ गार्डन विकसित करण्याचा विचार झाला.

कैलासनगर स्मशानभूमित गॕस लाईन व आँत्यसंस्कार (आॕपरेट )करणेकामी एजन्सी नेमण्याबाबत ठराव मंजूर झाला. वाहतूक सहकारी वार्डन यांना मुदतवाढ देण्यात आली. गवळीवाडा येथील वार्ड बी व सी करीता उंच पाण्याची आरसीसी टाकी बांधण्यासाठी कामास मंजुरी देण्यात आली. लोहगड उद्यानसमोर चौकाला स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर नाव देण्याचा ठराव मंजूर झाला.हनुमान टेकडी ते कैलासनगर या भागात आठवड्याचा बाजार भरविणे कामी विचार झाला.वलवण येथे शासनाच्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी दलीत वस्ती योजनेतून ग्रंथालय , जीम व कंपाउंवाॕल टाकणे कामाकरीता ठराव मंजूर झाला.तुंगार्ली डॕम परिसरात झीप लाईन उभारणे कामाचा ठराव मंजूर झाला. माझी वसुंधरा अभियानांतर्गत काम करण्यास मंजुरी देण्यात आली. लायन्स पाँईंट व टायगर पाँईंट येथे टाॕयलेट व बाथरूम पर्यटकाँसाठी बांधण्यासाठी व कचरा संकलन बाबत चर्चा झाली.डाॕ.बी.एन.पुरंदरे विद्यालयाचे मागे नगरपरिषदेच्या मैदानावर स्टेडियम हायमास्क दिवे बसविणे आदी ठराव झाले.

तुंगार्ली भागातील गायिका आशाताई भोसले यांचा बंगला ते सर्वे क्रमांक ७० हा रस्ता व गटारे बांधण्यासाठीचा विषय पञिकेतून काढून टाकण्यात आला. कुणेनामा येथील नगरपरिषदेचे हद्दीबाहेरील नळकनेक्शन देण्याबाबतचा विषय काढून टाकण्यात आला. सभेमधे लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यांचे आध्यक्षतेखाली सभा 11:30 ते 4 वाजेपर्यंत  झाली.

उपनगराध्यक्ष दिलीप दामोदरे , मुख्याधिकारी सोमनाथ जाधव,उपमुख्याधिकारी भगवान .खाडे तसेच विविध खात्याचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी अनेक नगरसेवक , नगरसेविका यांनी चर्चेत सहभाग घेतला.सभेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंटीँगचे पालन करण्यात आले.माञ मास्कशिवाय अनेक नगरसेवक ,नगरसेविका उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!