ताज्या घडामोडी

स्मशानभूमी व दफनभूमीसाठी निगडीतील जागा उपलब्ध करून द्या – नगरसेवक सचिन चिखले

निगडी : येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते व नगरसेवक सचिन चिखले यांनी निगडी मधील देहूरोड कन्टोनमेंटची 30 एकर जागा हिंदू-मुस्लिम लिंगायत व ख्रिश्चन तसेच इतर समाजाच्या स्मशानभूमीसाठी व दफनभूमीसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील ओटा स्कीम सेक्टर 22 येथील परिसरात विविध धर्माचे लाखो नागरिक राहतात. या नागरिकांना दिलेल्या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. या भागातील नागरिकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीतील व दफनभूमीतील जागा अपुरी पडत आहे.त्यामुळे भविष्यात अंत्यविधीसाठी या भागातील नागरिकांची मोठी तारांबळ होणार आहे. त्यामुळे नागरिकांना जागा उपलब्ध करून देण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!