ताज्या घडामोडी

सेप्टीक टॅक सफाई गाडीतील दुर्गंधीयुक्त पाणी सोडले जातय नैसर्गिक नाल्यात

तळेगाव : सेप्टीक टँक मधील मैला उपसणाऱ्या सफाई गाडीतील दुर्गंधीयुक्त पाणी नैसर्गिक नाल्यांचा वारंवार सोडले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.तळेगाव दाभाडे शहरात मुंबई – पुणे महामार्गा लगत असलेल्या फ्लोरा सिटी शेजारी नाल्यात सफाई गाडीतील दुर्गंधीयुक्त पाणी सोडतानाचा व्हिडिओ स्थानिक नागरिकांनी चित्रित केला आहे.

सेप्टीक टँक साफ करण्याचा व्यवसाय करणाऱ्या खाजगी व्यावसायिकांकडून नेहमीच मैलायुक्त पाणी या नाल्यात सोडले जात असल्याची माहिती नागरिकांनी दिली. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याच नाल्याचे पाणी पुढे नागरी वस्तीतून वाहत जाते. त्यामुळे हजारो नागरिकांचे आरोग्य या गैर प्रकारामुळे धोक्यात येत असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.

त्यातच याच नाल्याच्या बाजूला कचऱ्याचे ढीग साचलेले आहे. त्यामुळे तळेगाव शहर म्हणजे दुर्गंधीयुक्त व कचऱ्याचे साम्राज्य असणारे शहर असे चित्र मुंबई – पुणे महामार्गने जाणाऱ्या प्रवाशांना दिसत आहे.

नागरिकांच्या व जलचरांच्या जीवितास जाणीवपूर्वक धोका निर्माण करत नाल्यामध्ये मैलायुक्त पाणी सोडणाऱ्या या खाजगी व्यावसायिकांवर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. उघड्यावर कचरा टाकणा-या सामान्य नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणाऱ्या नगरपरिषदे मार्फत अशा व्यावसायिकांवर कारवाई होणार का? आणि अशा कृत्यांना आळा बसणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!