तळेगावमध्ये रोटरी क्लब स्विकारणार तुमच्या घरातील ई – कचरा
रोटरी क्लब लावणार ई - कच-याची विल्हेवाट
तळेगाव : रोटरी क्लब ऑफ एमआयडीसी व रोटरी क्लब ऑफ मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव शहरातील घराघरातून आज ई – कचरा शांताई सिटी येथे स्विकारणार आहे.
रोटरी क्लबच्या वतीने आपल्या घरातील वापरात नसलेले,खराब झालेले,किंवा नादुरुस्त असलेले फ्रीज,वाॕशिंग मशीन,इस्त्री ,ओव्हन,वाफ घेण्याचे यंत्र , हिटर,गिझर, इलेक्ट्रिक शेगडी, जुने कंम्प्युटर,सी.पी.यू. इलेक्ट्रिक खेळणी ,व इतर इलेक्ट्राॕनिक वस्तू व इलेक्ट्रिक साहित्य ,जुन्या वायरी,इलेक्ट्रिक बोर्ड ,बटण या वस्तू जमा करुन ज्या रिपेअरिंग करून वापरता येतील त्या रिपेअर करून गरीब लोकांना देण्यात येणार आहेत .
तसेच खूपच खराब झालेल्या वस्तू आहेत त्या शासकीय नियमानुसार शासकीय ठिकाणी त्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे .त्यामुळे आपल्या घरातील ई – कचरा रोटरी क्लबला द्यावा असे आवाहन रोटरीच्या वतीने करण्यात आले आहे.