ताज्या घडामोडी

पवन मावळ विभागातील शंभर तरुण कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश 

चांदखेड :  महाविकास आघाडीच्या माध्यमातून मावळ तालुक्यात सुनिल शेळके यांच्यावतीने सुरु असलेली विकास कामे पाहून प्रभावित होऊन तसेच पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष पै सचिन घोटकुले यांचे भविष्यात हात बळकट करण्याच्या उद्देशाने पवन मावळ भागातील विविध गावातील तसेच विविध पक्षामध्ये काम करित असलेल्या शंभर कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हा माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष अविनाश उर्फ गोट्याभाई फोडसे यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

या सर्व कार्यकर्त्यांचा आमदार सुनिल शेळके, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष पै सचिन घोटकुले यांच्या हस्ते पक्षप्रवेश संपन्न झाला. शंभर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केल्याने पवन मावळ भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!