ताज्या घडामोडी

हाॕटेल चालक , मालक आणि पर्यटकांनी नियमांचे पालन करून २५ डिसेंबर व ३१ डिसेंबर साजरा करावा – उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाटील

लोणावळा : हाॕटेल चालक , मालक आणि पर्यटकांनी नियमांचे पालन करून २५ डिसेंबर व ३१ डिसेंबर साजरा करावा. हाॕटेलमधे ड्रग्ज अॕंड ड्राईव्ह करू नये , गांजा , गर्द आदींचे सेवन , तसेच महिला आणि मुलींची छेडछाड करणे , अशा गोष्टी करणाऱ्या पर्यटकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असे लोणावळ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाटील यांनी इशारा दिला.

लोणावळा या थंड हवेच्या ठिकाणी २५ डिसेंबर ( नाताळ ) व ३१ डिसेंबर चे पूर्व तयारी बंदोबस्त कामी लोणावळा परिसरातूनच हाॕटेल चालक , मालक आणि एमआयडीसी येथील व्यवस्थापक यांची बैठक घेतली होती.

यावेळी लोणावळा शहरचे पोलिस निरिक्षक सिताराम डुबल, लोणावळा ग्रामिणचे पोलिसनिरिक्षक प्रविण मोरे तसेच गुप्तवार्ता विभागाचे पोलिस अधिकारी प्रविण गोसावी तसेच अनेक हाॕटेलचे मालक,चालक आणि व्यवस्थापक उपस्थित होते.

प्रास्तविक लोणावळा ग्रामिणचे पोलिस निरिक्षक सिताराम डुबल यांनी केले. लोणावळा शहरचे पोलिस आधिकरी प्रविण गोसावी यांनी भा.द.वि.कलम १४९ च्या नियमावलीचे पर्यटनस्थळ असल्याने वाचन केले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाटील म्हणाले, हाॕटेलमधे ड्रींक अँन्ड ड्राईव्ह , गांजा , गर्द या नशिल्या पदार्थाचे सेवन होणार नाही , यासाठी तसे होत असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. पर्यटकांना नाताळ व ३१ डिसेंबर साजरा करण्यास मज्जाव नाही; पण नियमांचे सर्व हाॕटेलमधे , रेस्टाॕरेंटमधे याचे पालन होणे आवश्यक आहे, असे आवाहन केले.

पर्यटकांनी कोविड १९चे दोन डोस घेतलेले असावेत.त्याचे ओळखपञ तपासले जावे , बेवारस वस्तूंच्या बाबत त्वरीत दक्षता घेऊन पोलिसांना संपर्क साधावा. अँब्युलन्सची व्यवस्था करावी.हाॕस्पिटलचे आत एमर्जन्सी एक्झिट ची सुविधा असावी.आग प्रतिबंधक साधने असावीत.मौल्यवान वस्तू चोरी जावू नये म्हणून न पर्यटकांना आनंद घेता यावा म्हणून सीसीटीव्ही लावून सुरक्षा रक्षक नेमावेत.पार्कींगची सोय स्वतंत्र करावी.चोरी होणार नाही .महिला व मुलींची छेडछाड होऊ नये , म्हणून हाॕटेलमधे हाॕटेल चालक मालक यांनी दक्षता घ्यावी. तसेच सर्व स्पिकर आणि वाद्य वाजवणे , यांच्या परवानगी घेतली जावी असे सांगण्यात आले. यावेळी आभार लोणावळा शहरचे पोलिस निरिक्षक सिताराम डुबल यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!