ताज्या घडामोडी

पिंपळगाव राजा येथील covid-19 लसीकरणास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

पिंपळगाव : पिंपळगाव राजा येथील वॉर्ड क्रमांक 5 मध्ये कोव्हीड लसीकरणास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.फातिमा शेख एज्युकेशन वेल्फेअर सोसायटी व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोव्हीशिल्ड लसीकरणास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. लसीकरणा संबंधी असलेली भीती व गैरसमज आता दूर होत असल्याचे पहावयास मिळाले.


सकाळ पासूनच महिलांची गर्दी दिसून आली. तर युवकांनी घरोघरी जाऊन लाभार्थ्यांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करून लसीकरणकेंद्रात आणले.येथील टिपू सुलतान सभागृहात आयोजित कॅम्प चे नियोजन मो. अकिब जावेद तसेच सामाजिक कार्यकर्ते शहाबुद्दीन जमादार यांच्या सह शमशेरपूरा भागातील उत्साही युवकांनी केले.


या सामाजिक उपक्रमाबद्दल सरपंच शेख शाकिर शेख चांद यांनी सुंदर स्मृतिचिन्ह देऊन अकिब जावेद यांचा सत्कार केला. प्रमुख उपस्थितीत जागतिक आरोग्य संघटनेचे SBM प्रतिनिधी डॉ किशोर चव्हाण यांनी याप्रसंगी जास्तीत जास्त नागरिकांनी आता पुढे येऊन लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले. यावेळी बी डी ओ राजपूत, जि प माजी सदस्य श्री जुलकर, श्री अलीमभाई,यां सह सर्व ग्राम पंचायत सदस्य, व सोसायटीचे प्रतिष्टीत नागरिक प्रा आ केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ पानझाडे ,डॉ खंडारे, स. आरोग्य अधिकारी डॉ मुझम्मील, आरोग्य सेवक इवरकर, डेटा एन्ट्री ऑपरेटर मंगेश, ग्रामसेवक चव्हाण स्थानिक आशा सेविका,अंगणवाडी सेविका,मदतनीस उपस्थित होते. सर्वांनी वॉर्डातील नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!