ताज्या घडामोडी

त्या तरुणाचा खून हातोडीने ; दोघेजण ताब्यात

तळेगाव : तळेगाव दाभाडे येथील दशांत अनिल परदेशी याचा खून गोळ्या झाडून नव्हे तर हातोडीने झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून निष्पन्न झाली आहे.

याप्रकरणी दशांतचे वडील अनिल परदेशी यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती .

दशांत बुधवारी उशिरापर्यंत घरी आला नाही त्यामुळे त्याच्या घरातील लोकांनी त्याचा शोध घेतला असता तर त्यांचा मृतदेह हेवी कंपनी जवळ आढळला. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास वडिलांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

याप्रकरणी पोलिसांनी मयताचा सख्खा चुलत भाऊ कमलेश सुरेश परदेशी (वय २० वर्षे) व प्रकाश संजय लोहार ( वय 19 वर्षे दोघेही राहणार नालबंद गल्ली रविवार पेठ,तळेगाव) यांना ताब्यात घेतले आहे .

मुख्य आरोपी कमलेश परदेशी यांच्याशी सहा महिन्यापूर्वी मयत दिशांतचे वाद झाले होते .एकमेकांना खुन्नस देत त्यांचा वाद सुरू होता. दिशांतनी आपल्या मोबाईलवर ठेवलेल्या स्टेटसमुळे तो आणखीनच वाढला .आरोपीने राग मनात धरून प्रशांतला बोलावून घेतले व हातोडीने त्याच्यावर डोक्यात वार केला. हातोड्याचे अणुकुचीदार टोक त्याच्या डोक्यात घुसवून त्याचा खून केला.

 

 

 

 

 

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!