ताज्या घडामोडी
शंकरराव शिर्के गुरव समाज पुरस्काराने सन्मानित
कार्ला :अखिल गुरव समाज संघटना संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.मा.श्री अण्णासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सांगली, येथे संत काशिबा महाराज पुण्यतिथी सोहळा, मोफत वधु वर मेळावा, राज्य पुरस्कार सोहळा , गुरव ग्रंथ भाग 2 पुस्तक प्रकाशन कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला.
पुणॆ जिल्हा गुरव समाजाचे अध्यक्ष श्री शंकरराव शिर्के यांना गुरव समाज भुषण पुरस्काराने ॲड. श्री अण्णासाहेब शिंदे यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी राज्य पदाधिकारी व सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी, तालुक्यातील पदाधिकारी, युवा पदाधिकारी, तसेच महिला पदाधिकारी व जिल्ह्यातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.