ताज्या घडामोडी
रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेचे वर्ष १९९७-९८ या बॅच चे गेट टू गेदर संपन्न
अनेक वर्षांनी जुन्या आठवणींना मिळाला उजाळा
तळेगाव : रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन , तळेगांव दाभाडे येथील वर्ष १९९७ – ९८ या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे गेट – टू – गेदर नुकतेच संपन्न झाला.
उस्मानाबाद , सोलापूर , मुंबई , नाशिक , पुणे , सांगली आणि मावळ तालुक्यातील होस्टेल ला वास्तव्यास असणारे विद्यार्थी आणि मुली असे ७५ माजी विद्यार्थी आणि शिक्षक यानिमित्ताने उपस्थित होते.
अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला आणि विविध स्पर्धांचा आनंद घेत पुन्हा एकदा बालपणीच्या आठवणीत रमले.
शाळेबाबतीत असलेली कृतज्ञता आणि सामाजिक भान लक्षात ठेवून या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आलेल्या निधी संकलनातुन शाळेला संगणक संच भेट देण्यात येणार आहे.