ताज्या घडामोडी

खून प्रकरणातील आरोपींनी केला पोलिसांवर गोळीबार ; पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश किरकोळ जखमी 

पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

चिंचवड : पिंपरी चिंचवड शहराला हादरवणाऱ्या खुनाच्या प्रकरणातील फरार आरोपींनी पोलिस अधिकाऱ्यांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. योगेश जगताप खून प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिस गेले असता पोलिस व आरोपी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश किरकोळ जखमी झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड मध्ये भरदिवसा गोळ्या झाडून योगेश जगताप यांचा खून करण्यात आला. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मोटे आणि अश्विन चव्हाण फरार होते.फरार आरोपी चाकण परिसरातील कोये येथे असल्याची अकराच्या सुमारास माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक तेथे गेले.

कोये परिसरातील एका टेकडीवर हे आरोपी लपून बसले होते. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. अर्ध्या तासाच्या चकमकीनंतर पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या.या घटनेत पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश किरकोळ जखमी झाले आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!