ताज्या घडामोडी

लोणावळ्यात सायकल रॕलीत अभिनेञी आयेशा झुल्का व मराठी चिञपट अभिनेता सिध्दार्थ जाधव सहभागी होणार

लोणावळा :  लोणावळ्यात सायकल रॕलीत व plog- o -than या कार्यक्रमासाठी सिनेअभिनेञी व लोणावळ्याची ब्रँड अँबॕसिटर आयेशा झुल्का तसेच मराठी चिञपटातील अनेक अजरामर भूमिका करणारा अभिनेता सिध्दार्थ जाधव लोणावळ्यात ता.३० रोजी येणार आहे.

लोणावळा नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव बोलत होत्या .यावेळी मुख्याधिकारी सोमनाथ जाधव उपस्थित होते. उपनगराध्यक्ष माञ गैरहजर होते.

यावेळी नगरसेविका बिंद्रा गणाञा , मागासवर्गीय कल्याण समिती सभापती मंदाताई सोनवणे , नगरसेविका व माजी उपनगराध्यक्षा सुवर्णा अकोलकर , आरोग्य समिती सभापती रचना सिनकर , नगरसेवक देवीदास कडू, ललीत सिसोदिया , उपमुख्याधिकारी भगवान खाडे , तसेच पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ही सायकल रॕली सकाळी साडेसहा ते सात दरम्यान लोणावळा नगरपरिषदेच्या इमारतीचे जवळून निघेल , खुला गट पुरूष , खुलागट महिला व अठरा वर्षाचे आतील विद्यार्थी व विद्यार्थीनी यांचा गट यामधे उपस्थित राहील .लोणावळा नगरपरिषदेचा सर्व शाळा माध्यमिक विद्यालये व खाजगी शाळांमधील विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत.

सर्व सहभागी स्पर्धकांना माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ चे टी शर्ट आणि कॕप तसेच विजेत्या स्पर्धकांना आकर्षक ट्राॕफीचे बक्षीस दिले जाणार आहे. जेष्ठ नागरिक संघ ,नवमी भजनी मंडळ ,लायन्स क्लब , रोटरी क्लब आणि पञकार , मावळ वार्ता फौडेशन , सूर्यनमस्कार मिञ मंडळ यांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.यात मावळ वार्ता फौडेशनचे संजय आडसुळे, बाप्पूलाल तारे,जेष्ट नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे ,नवमी भजनी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प.काळुराम देशमुख,हभ.प.खंडू कंधारे आणि वारकरी , शिक्षक , सूर्यनमस्कार मंडळांच्या संयोजिता साबळे , गायञी जोशी आदी उपस्थित होते.

यावेळी पर्यावरण – वसुंधरा शपथ घेण्यात आली. ता.३० सकाळी नऊ वाजता नगरपरिषदेच्या कार्यालयाजवळ विविध स्पर्धेत बक्षीस मिळविलेल्या स्पर्धकांना आयेशा झुल्का व सिध्दार्थ जाधव यांचे हस्ते बक्षिसे मिळणार आहेत. लोणावळा शहर देशात दुसरा क्रमांक मिळवून स्वच्छ सर्वेक्षण मधे चारही वर्षी बक्षिस मिळवून यावर्षी दुसरा क्रमांक मिळवून आव्वल ठरले.राष्ट्पती रामनाथ कोविद यांचे हस्ते बक्षीस मिळवले आहे. पुढील वर्षी २०२२ मधे प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी सर्वांनी सज्ज राहा ,असे नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यांनी आवाहन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!