दवाखान्याच्या बाजूला कचरा; कोणीतरी आवरा
कामशेत : कामशेत ही आजूबाजूच्या सत्तर गावांची बाजारपेठ आहे. कामशेत हे आंदर मावळ, पवन मावळ व नाणे मावळ मध्ये जाण्याचा केंद्रबिंदू आहे. त्यात मावळ तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झालेली असली तरीही धोका कायम आहे. कामशेत मध्ये जवळपास ५० हुन अधिक लहान – मोठे दवाखाने आहेत. ह्यामध्ये खास लहान मुलांसाठी असलेले दवाखाने देखील आहेत. अश्याच दवाखान्याच्या बाजूला कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले पहावयास मिळते आहे. लहान मुलांच्या आरोग्याच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालक आपल्या मुलांना ह्या दवाखान्यात औषधोपचारासाठी नेत असतात अश्यातच पालकांना ह्या दुर्गंधीचा व घाणीचा सामना करत जावे लागते आहे.
दवाखाण्याच्या प्रवेश द्वाराजवळ गेले असता ही घाण प्रामुख्याने पाहवयास मिळते. ह्या घाणीमध्ये गुटख्याची पाकीट, जर्दा ची पाकिटे खाऊन लोकांनी थुंकलेले आढळून येते आहे. अश्या घाणीमध्ये आपली मुलं औषधोपचारासाठी कशी न्यायची हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. हा कचरा गोळा करत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे व अश्या प्रकारचा कचरा करणाऱ्यांवर ग्रामपंचायत काय कारवाई करणार ह्याकडे कामशेतकरांचे लक्ष आहे.