ताज्या घडामोडी

लोणावळा-खंडाळा परिसरात बंगले भाड्याने देताय मग हे वाचाच

लोणावळा : राज्यात जमावबंदी  लागू असल्याने नववर्षाच्या स्वागताला लोणावळा व परिसरात बंगले भाड्याने दिल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेचे विठ्ठल सूर्यवंशी यांनी दिला आहे.

लोणावळा-खंडाळा परिसरात नववर्षाच्या स्वागताला बहुतांशी बंगले भाड्याने देण्यात येतात. हे बंगले निवासी तत्त्वावर नोंदणीकृत असतानाही प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता शहरात भाड्याने देण्यात येतात. ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची असून कोणत्याही परिस्थितीत निवासी बंगले नववर्षाचे सेलिब्रेशन साठी तसेच इतर वेळेस भाड्याने देऊ नयेत बंगले भाड्याने दिल्यास कारवाई केली जाईल असे आदेश देण्यात आले आहेत.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!