ताज्या घडामोडी

इको इनव्हारनमेंट नॅशनल ब्युटी पेजन्ट ऑफ इंडिया 2022 च्या निवड चाचणीला सुरूवात

विश्रांतवाडी: इको इनव्हारनमेंट नॅशनल ब्युटी पेजन्ट ऑफ इंडिया 2022 (फॅशन शो ) नुकतीच निवड चाचणीला सुरूवात करण्यात आली असून या मध्ये पहिल्याच फेरीला महिलांचा मोठा सहभाग घेतला.याचे उदघाटन मिस इंडिया आर्थ 2019च्या उत्तजनार्थ सायली सुर्वे यांच्या हस्ते केले.

पुण्यातील सोल इन्टरटेन्मेंट यांच्या वतीने पुणे शहरात प्रथम मोठ्या पातळीवर सोल डान्स अ‍ॅकॅडमीचे संस्थापक आणि मराठी व हिंदी चित्रपट क्षेत्रातील नृत्य दिग्दर्शक संजय उर्फ सनी गाडे यांनी फॅशन शो निवड चाचणी ( ऑडीशन )चे आयोजन केली आहे.या मध्ये वेगवेगळ्या वयोगटातील लहान मुली, महिला ,वृध्द, मुले,पुरूष मंडळी आदीने या निवड चाचणी सहभाग घेतला.

पहिल्याच फेेरीत प्रतिसाद मिळाल्याने पुणेकारांना विजयाची सर्वणसंधी मिळाणार असल्याने संस्थेच्या माध्यामातून दुसर्‍या फेरीचे आयोजन 9 जानेवारीला औंध येथील फ्युजन फिटनेस अ‍ॅकॅडमी गितांजली बिल्डींग मेडीपाँईट हॉस्पीटल जवळ डीपी रोड, येथे केले आहे. तसे भारतातील छोट्या व मोठया शहरामधून निवड चाचणी (ऑडीशन )ऑनलाइन पध्दतीने घेण्यात येणार असल्याचे आयोजन समितीने सांगितले.यासाठी 9623558858 या क्रमांक संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी सायली सुर्वे,डा.राजेंद्र भावळकर, सारिका शेठ, सतिश मित्तल,सुनिता मित्तल,स्मिता घुले,दिलीप देवकर,क्रिश गाडे, भाग्यश्री बोरसे,अंजली जगताप, गौरी कदम भांडगे,विद्यासागर कलावंत ,योगेश दवने, दीशा साळवे,प्रशांत नाईक ,जान्हवी शिंदे ,प्रफुल्ल बनसोडे , स्वाती चौधरी नाईक, आदी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!