ताज्या घडामोडी

मावळ व आंबेगाव येथील बैलगाडा शर्यती रद्द ; आमदारांनी केले आदेशाचे पालन

लोणावळा :  मावळ व आंबेगाव येथील बैलगाडा शर्यती स्थगित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी संयोजक यांना आदेश दिल्याने या बैलगाडा शर्यतीला ब्रेक लागला आहे. या बैलगाडा शर्यती जरी रद्द करण्यात आल्या असल्या ;तरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर या शर्यती पुन्हा मोठ्या जोमाने भरवू , असे मावळच्या जनतेला व बैलगाडा शौकीन यांना मावळचे आमदारांनी श्री.शेळके यांनी जाहीर केले.

सन २०१५ मधे बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. डिसेंबर २०२१ च्या सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली होती. त्यामुळे बैलगाडा शर्यती मावळ व आंबेगाव येथे मोठ्या उत्साहात आमदार सुनिलआण्णा शेळके व माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी आयोजित केल्या होत्या. जिल्हाधिकारी यांनी संयोजक यांना कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रमाला पन्नास लोकांना फक्त परवानगी दिल्याचे व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैलगाडा शर्यती स्थगित करण्यात येत असल्याचे आदेश लेखी स्वरूपात दिले आहेत.

त्यामुळे लाखोंची बक्षिसे , मोटारसायकल , सोन्याच्या अंगठ्या आदी बक्षीसे ठेवलेल्या बैलगाडा शर्यती शासनाच्या पुढील आदेशानुसार रद्द करण्यात आल्याचे व कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यनंतर या शर्यती नव्या जोमाने घेण्यात येईल,आसे सोशल मिडियाद्वारे मावळचे आमदार श्री .शेळके यांनी जाहीर केले. या शर्यतीमधे सहभागी होणाऱ्या बैलगाडा मालकांकडून शर्यतीचे गावी टोकन घेण्यासाठी मोठी गर्दी केल्याने उत्सवाचे स्वरूप आले होते ,माञ या नववर्षाचे पहिल्या दिवशीच या उत्सवावर पाणी पडले.सर्व बैलगाडा शौकीन व बैलगाडा मालक यांचा हिरमोड झाला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!