ताज्या घडामोडी
वेहेरगावचे उद्योजक विलास कुटे यांचे निधन
लोणावळा : श्री एकविरा देवस्थानचे माजी खजिनदार व वेहेरगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य , उद्योजक विलासभाऊ मधुकर कुटे (वय-५५) यांचे श्री एकविरा देवीच्या मंदिरात आज सकाळी अभिषेक करण्यास गेले असता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांचे पश्चात पत्नी , मुलगा , विवाहित मुलगी , वडील , भाऊ , असा परिवार आहे. कै.विलासभाऊ कुटे यांचे निधनामुळे वेहेरगाव व पंचक्रोशित शोककळा पसरली आहे. त्यांचा अंत्यविधी आज सकाळी वेहेरगाव येथील वैकुंठ स्मशानभूमित होणार आहे.