तळेगांव आगारातील कर्मचाऱ्यांनी मागितली स्वेच्छा मरणाची परवानगी
तळेगाव : एस. टी.आगारातील कर्मचाऱ्यांनी महामंडळातील मिळणारे तुटपुंजे वेतन व मानसिक त्रासामुळे सुमारे ६५ कर्मचारी यांनी आत्महत्या केल्या आहेत. आमच्याही मनात आत्महत्या करण्याचे विचार येतात परंतु आत्महत्या करणे कायद्याने गुन्हा असल्याने आम्ही आत्महत्या करू शकत नाही. एस टी महामंडळाला राज्य शासनात विलीन करून राज्य सरकारी कर्मचाऱ्यां प्रमाणे सेवा जेष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणी देण्यात येवून आम्हाला आर्थिक व मानसिक त्रासातून मुक्त करावे. अन्यथा आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी अशी मागणी मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना केली आहे.
याबाबतचे निवेदन आज मावळ तालुक्याचे तहसीलदार आर. व्ही. चाटे साहेब यांना देण्यात आले. यावेळी कामगार प्रतिनिधी कैलास शेळके, साहेबराव गायकवाड, पांडुरंग बांदल, धनराज मुंडे, दिवाकर रोझतकर, बळीराम डोईफोडे, विजय चौरे, भारत कोकणे, गणेश मुंडे आदी कर्मचारी उपस्थित होते.