कोरोनाचे दूत बनून इतरांचे आरोग्य धोक्यात आणू नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : कोरोनाचे दूत बनून इतरांचे आरोग्य धोक्यात आणू नका असे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले आहे. त्याचबरोबर नियम धुडकावणा-यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश यंत्रणांना मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
कोरोनाच्या विषाणूशी लढताना 2 वर्षे झाली आहेत. या काळात आपण संसर्गाच्या दोन लाटा अनुभवल्या आणि काळजीपूर्वक पाउल उचलत तर रोखल्या सुद्धा आहेत असे ठाकरे म्हणाले .
वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य विभाग यांच्याशी चर्चा करून तसेच वैद्यकीय क्षेत्रातील सर्व संबंधितांशी विचारविनिमय करून आपण राज्यात निर्बंध लावण्याचे ठरविले आहे. आपल्याला काम बंद करायचे नाही, तर गर्दी बंद करायची आहे.रोजीरोटी बंद करायची नाही, जीवन थांबू द्यायचे नाही. पण काही बंधने पाळून या विषाणू पासून राज्य कायमचे मुक्त करायचे आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.