तळेगावमध्ये उद्या भव्य कोविड लसीकरण अभियान
तळेगाव : तळेगाव दाभाडे नगरपरिषद व तालुका आरोग्य विभाग मावळ यांच्या वतीने उद्या (12 जानेवारी) रोजी सकाळी 9:00 ते सायं 5:00 वाजेपर्यंत तळेगाव शहरात भव्य कोविड लसीकरण अभियान आयोजित करण्यात आले आहे. सदर लसीकरण अभियान पूर्णतः मोफत असून तज्ज्ञ डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ व प्रक्षिशीत कर्मचाऱ्यांच्या मदतीने सर्व लसीकरण अभियान राबविले जाणार आहे.
या लसीकरणाचा एक अथवा दोनही डोस बाकी असणाऱ्या संबंधित सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तळेगाव दाभाडे नगरपरिषद व तालुका आरोग्य विभाग- मावळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
खालील केंद्रांवर होणार लसीकरण :-
1) प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव दाभाडे
2) नथुभाऊ भेगडे पाटील शाळा क्र.1 मारुती मंदिर चौक, तळेगाव दाभाडे
3) अथर्व हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे
4) हरणेश्वर हॉस्पिटल,तळेगाव दाभाडे
5) संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्र.6 (गुलाबी शाळा ) वतननगर
लसीकरणासाठी देण्यात आलेल्या सूचना :-
– वरील लसीकरणाच्या ठिकाणी फक्त कोविशिल्ड लस उपलब्ध असेल.
-लसीकरण साठी येताना स्वतःचे आधार कार्ड सोबत आणावे.
– लसीकरण साठी येताना नाश्ता/ जेवण करून यावे.
– लसीकरण केंद्रावर एकाचवेळी गर्दी न करता आपल्या सेवेत असणाऱ्या लसीकरण स्टाफला सहकार्य करावे.
– लस घेणे अगोदर स्वतःस सर्दी, खोकला, ताप अथवा अन्य काही त्रास असलेस केंद्रावरील डॉक्टर यांचा सल्ला घेउनच लस घ्यावी.