ताज्या घडामोडी

पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळे व गड-किल्ले परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली ,आंबेगाव, जुन्नर ,भोर वेल्हा या तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू गड किल्ले व स्मारके पर्यटन स्थळ धरणे इत्यादी ठिकाणी काल मंगळवारी(दि.१०) मध्यरात्रीपासून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे.पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेश काढले आहेत.

ग्रामीण भागातील मावळ, मुळशी,हवेली, आंबेगाव, जुन्नर भोर व  वेल्हा तालुक्यातील पर्यटन स्थळे व गड-किल्ल्यांवर पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी येतात. सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा  प्रसार होऊ नये यासाठी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हा प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे.

प्रतिबंधित क्षेत्रे पुढलप्रमाणे

मावळ : भुशी डॅम, घुबड तलाव, लोणावळा डॅम, तुंगार्ली डॅम, राजमाची पॉइंट ,मंकी पॉईंट, अमृतांजन ब्रिज, वेहेरगाव ,टायगर पॉइंट, लायन पॉइंट , शिवलिंग पॉइंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला ,पवना धरण परिसर

मुळशी : लवासा, टेमघर धरण परिसर, मुळशी धरण परिसर, पिंपरी पॉईंट, सहारा सिटी, कोळवण परिसर

हवेली : घेरा सिंहगड,सिंहगड किल्ला, डोणजे, खडकवासला धरण

सदरचे आदेश पोलीस, शासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर ,अत्यावश्यक सेवेतील वाहने यांना लागू राहणार नाही.या आदेशाचे कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 नुसार दंडनिय कायदेशीर कारवाईस पात्र राहतील असा इशारा देण्यात आला आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!