मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे भातखळकर यांच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन
वडगाव : मावळ तालुक्याचे आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या वर झालेले आरोप तसेच समाजात जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ वडगाव येथे भातखळकर यांच्या प्रतिमेवर जोडो मारो आंदोलन करण्यात आले .तसेच यावेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा नोंदवावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.
यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे, ग्रामीण ब्लॉकचे अध्यक्ष सुभाषराव जाधव,पुणे जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विठ्ठलराव शिंदे नारायण ठाकर, साहेबराव कारके, पं स सदस्य कृष्णा दाभोळे, सुवर्णाताई राऊत रुपालीताई दाभाडे, विणाताई करंडे सविता मंचरे, सुनिल दाभाडे ,अतुल राऊत, नवनाथ चोपडे, आफताब शेख, कैलास गायकवाड, विक्की लोंखडे, अंकुश आंबेकर ,निलेश राक्षे ,तुषार काळोखे अंजिक्य टिळे संजय शेडगे , निवेदन देताना उपस्थित होते.
तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी आपल्या भाषणात भातखळकर यांच्यावर फौजदारीची कारवाई करा अशी मागणी केली .भाजपची अशी लोक समाजात फुट पाडण्याचे काम करतात .मावळचे आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या प्रयत्नातून तालुक्यात विकासासाठी 800 कोटीचा निधी आणुन विकासाची कामे चालू आहे. खोट्या अफवा पसरवून नाहक बदनामी केली जाते. या पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा देण्यात आला. यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.