ताज्या घडामोडी
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी प्रा. दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे
पुणे : पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपदी प्रा. दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे यांची निवड झाली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी काही नावे चर्चेत होती. निवडून आलेल्या सर्व संचालकांची अजित पवार यांनी बैठक घेऊन बैठकीत नाव निश्चित करण्यात आले. बँकेच्या 21 संचालकांची निवडणूक नुकतीच झाली. त्यात 17 जागा जिंकत राष्ट्रवादीने जिल्हा बँकेवर वर्चस्व प्रस्थापित केले.आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली.