नायगांव येथील महिला प्रशिक्षणास उत्स्फुर्त प्रतिसाद
कामशेत : आदर्श सरपंच संतोष भाऊ जांभुळ कर युवा मंच च्या वतीने नायगांव येथील मारुती मंदीरामध्ये प्रशिक्षण घेण्यात आले .आठ दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये महिलांना केक बनवणे ,कापडी पिशवी बनवणे, मसाले तयार करणे अशा विविध विषया वर प्रशिक्षण राबवण्यात आले .त्यामध्ये विशेषत्वाने स्वयंरोजगार कसा करावा या विषया संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले .
या वेळी आदर्श सरपंच संतोष भाऊ जांभुळ कर आपल्या मनोगता त म्हटले कि महिलांच सबलीकरण व सक्षमीकरण झाल पाहीजे प्रत्येक महिलेने आपला संसार सांभाळू न कुंटूबाला हातभार लावला पाहीजे. या पुढील काळात महिलांनी घरगुती बनवलेल्या वस्तुना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल .
उपस्थितां मध्ये आदर्श मा. सरपंच संतोष जांभुळकर कान्हे नायगांव ग्रूप ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच विजयराव सातकर ,ग्रा .पं. सदस्य बाबा जी चोपडे, आरीफ मुलाणी, अंकुश चोपडे, संदीप ओव्हाळ, सुजाता चोपडे, रोहिणी चोपडे ,मा. उपसरपंच मधुरा ओव्हाळ, रामदास जांभुळ कर, योगेश शिंदे, तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता .