ताज्या घडामोडी

मळवली देवले मार्गावरील पुलाचे अर्धवट काम धोकादायक

लोणावळा : मळवली देवले मार्गावरील पुलाचे अर्धवट काम धोकादायक स्थितीत असून कठडा बांधायला ठेकेदार यांना वेळ मिळाला नाही का ? असा प्रश्न औंढे , औंढोली , देवले , मळवली व भाजे ग्रामस्थांनी केले आहे. हा पूल पावसापूर्वी घाईघाईने बांधण्याची वेळ आली. पण पावसाळा संपून चार महिने उलटून गेले ;तरीही आद्याप या पुलाच्या कठड्याला पाईप किंवा काँक्रीटीकरण केलेला कठडा बसविण्यास वेळ मिळाला नाही.

देवलेतील सरपंच व उपसरपंच तसेच सदय्य यांचे लक्षच नाही. या पुलाचे काम सुस्थितीत झाले का ? पुलावर वाहने चढताना मोठा वरांधा घातला असल्याने गाड्यांना पुल चढताना व उतरताना वाहनचालकांना जीव मुठीत धरून जावे लागते. या पुलाच्या बांधकामाचे स्ट्रक्चरल आॕडीट करावे , त्यात भ्रष्टाचार झालेल्या पदाधिकारी यांचेवर कडक कारवाई करावी , तसेच पदावरून दूर करावे ,अशी ग्रामस्थ मागणी करत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!