ताज्या घडामोडी

लोणावळ्यात ४१ अस्थापनांवर दंडात्मक कारवाई ; २१ हजार 660 रूपये दंडवसूल

लोणावळा :  लोणावळ्याच्या प्रवेशद्वारावर हाॕटेल सेंटर पाँईंट व खंडाळा एक्झिट जवळ दोन डोस घेतलेल्या पर्यटकांना फक्त प्रवेश देण्यासाठी प्रशासनाने चेकपोस्ट उभे केले असून काल व आज असे दोन दिवसांमधे चौदा दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली . रविवारी ता.१६ रोजी १४ दुकानदारांवर कडक कारवाई करून आनुक्रमे १८० /- व रूपये ५००/- प्रमाणे ४,१२०/- रूपये वसूल केले. ता.१७ रोजी सोमवारी लोणावळा बाजारात १३ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करून आनुक्रमे १८०/-,रू ५००/-, रू ५,०००/- रूपये प्रमाणे १०,५४०/- रूपये व खंडाळा बाजारातील दुकानदारांवर कारवाई करून सात हजार रूपये वसूल केले आहे., असे प्रशासकीय आधिकारी सोमनाथ जाधव यांनी पञकारांना माहिती देताना सांगितले .

नागरिकांकडून व दुकानदारांनी स्वच्छतेबाबत काळजी घ्यावी . ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी दोन डस्टबीन ठेवावे . गटारावरील अतिक्रमणे काढून टाकावी , दुकानदारांनी दुकानासमोर स्वच्छता ठेवावी, सिंगल युज प्लॕस्टीक वापरू नये व प्लॕस्टीक पिशव्यांचा वापर करू नये. कोरोनाचा संसर्गाला रोखण्यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर करावा , तसेच ओला व सुका कचरा वेगळा करून घंटागाडीत टाकावा , अशा सूचना देण्यात आल्या.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!