ताज्या घडामोडी

श्री काळभैरवनाथ मंदिरावर कळस बसविण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

लोणावळा : आई श्री एकविरा देवीचा भाऊ श्री काळभैरवनाथ मंदिरावर कळस वाजत गाजत बसविण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी कळसाची वाजत गाजत विश्वस्त व ग्रामस्थांचे उपस्थितीमधे मिरवणूक काढण्यात आली.

या मंदिरात सोमवारी ता.१७ जानेवारी रोजी सकाळ पासुन मंदिरात मान्यवरांचे हस्ते अभिषेक करण्यात आला. मंदिरात होम विधी करण्यात आला. श्री काळभैरवनाथ मंदिरा वरती कळस विधी पुजन पालखी मिरवणूक काढून वाजत गाजत भजन म्हणत पुन्हा कळस पुजन करुन मंदिरामध्ये आरती घेण्यात आली व नंतर मंदिरावर कळस बसवण्यात आला. कळस बसवल्यानंतर श्री काळभैरव नाथ देवाला नैवद्य दाखवला. नंतर ग्रामस्थ व शेकडो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

श्री काळभैरवनाथ जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष मारुती देशमुख, उपाध्यक्ष किसन आहेर, सल्लागार महादू देशमुख, सचिव अशोक कौदरे, सदस्य धोंडू शिंदे, सदस्य काळूराम देशमुख, सदस्य सुरेश शिर्के, सदस्य अशोक रोकडे, सदस्य आनंता शिंदे, सदस्य यशवंत आहेर, सदस्य धोंडू आहेर, सदस्य शंकर ढाकोळ, सदस्य रवी कौदरे, सदस्य मधुकर पवार व ग्रामस्थ मंडळी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.

तसेच भाविक भक्त सतिश खेत्री, वाकसई गावचे विद्यमान सरपंच दीपक काशीकर, श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट चे खजिनदार नवनाथ देशमुख, मा. उपसरपंच गणेश देशमुख, उपाध्यक्ष राष्ट्रवादी मावळ हनुमंत आहेर, अखिल गुरव समाज संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष शंकर शिर्के, एकविरा सेवा प्रतिष्ठान खजिनदार भगवान देशमुख, माजी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र देशमुख, उद्योजक जगन्नाथ आहेर, ग्रामपंचायत सदस्य दिलीप देशमुख, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र शिंदे व इतर ग्रामस्थ मंडळी, भाविक भक्त व महिलावर्ग मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!