ताज्या घडामोडी

अँटीबॉडी कॉकटेलने कामशेतमध्ये कोरोनारुग्णांवर यशस्वी उपचार

कामशेत : कामशेत मधील बडे हॉस्पिटलमध्ये रुग्णाला मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेलचा डोस देण्यात आला. हा डोस दिल्यानंतर ४ तासात प्रक्रुतीत सुधारणा दिसुन आली असे हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. राहुल बडे यांनी सांगितले. मोनोक्लोनल अँटीबॉडी हे कोरोनाच्या हानिकारक व्हायरसविरोधात काम करते. अशाच अँटीबॉडी कॉकटेलचा डोस अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना उपचारात देण्यात आला. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.‌‌

 

डॉ राहुल बडे यांनी सांगितलं कि हे औषध शरीरात गेल्यानंतर विषाणूला ब्लॉक करते. यामुळे कोरोना विषाणूला दुसऱ्या पेशींमध्ये प्रवेश करता येत नाही. कारण या औषधामुळे कोरोना विषाणूला शरीरात पसरण्यासाठी पोषक घटकच मिळत नाहीत. या दोन्ही अँटीबॉडी मिळून कोरोना विषाणूला शरीरात वाढण्यापासून, पसरण्यापासून रोखतात आणि अशा पद्धतीने विषाणूला न्यूट्रीलाईज (परिणामशून्य) करतात. कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाला डॉक्टरांच्या सल्ल्यानं ४८ ते ७२ तासांच्या आत हे औषध दिले जाऊ शकते.

 

संसर्गाची माहिती मिळाल्यानंतर तातडीने औषध देणं फायदेशीर असतं. याचं कारण विषाणू शरीरात शिरल्यानंतर पहिल्या सात दिवासातच विषाणू शरीरात वेगानं पसरतो. जेवढ्या लवकर विषाणू मल्टिप्लाय होण्याच्या वेगाला रोखलं जाऊ शकेल, तितक्या लवकर रुग्ण बरा होईल. हे औषध कोव्हिड-19 च्या माईल्ड ते मॉडरेट रुग्णांसाठी आहे. मात्र, त्यासाठीही डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. जे रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर आहेत, ज्यांना सिव्हियर कोव्हिड-19 संसर्ग आहे, ज्यांच्या फुफ्फुसात विषाणू शिरला आहे, त्यांच्यावर या औषधाचा काहीच परिणाम होत नाही.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!