ताज्या घडामोडी

जगन्नाथ सिन्नरकर यांच्यावतीने कुणे ना.मा येथील जिल्हा परिषद शाळेत वह्यावाटप

कुणे : खंडाळ्याजवळील कुणे ना.मा येथील जिल्हा परिषद शाळा ही खूप उपक्रमशील आहे.या शाळेजवळून जात असताना नवी मुंबई येथील मा.उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांनी शिक्षकांची विद्यार्थ्यां प्रति असणारी तळमळ पाहिली.त्यांच्या शिक्षणप्रक्रियेतील अडीअडचणी जाणून घेतल्या.विद्यार्थ्यांना शासनाकडून पुस्तके,गणवेश प्राप्त होतात.परंतु पुरेशा वह्यांअभावी त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे हे पाहून सुमारे २५००० रु.किंमतीच्या वह्या शाळेतील पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत दिल्या.नुकताच मोफत वह्या वाटपांचा हा कार्यक्रम शाळेत पार पडला.

यावेळी सिन्नरकर यांचे कुटुंबीय,मा.सरपंच संदीप उंबरे,अनिल पिंगळे,मुख्याध्यापक सहादू मानकर,शिक्षक सुषमा ढोबळे,मंगल भेस्के,मीना शिंदे,विलास वरे इ.मान्यवर उपस्थित होते.

जगन्नाथ सिन्नरकर यांच्यासारखे दानशूर व्यक्ती समाजात निर्माण झाल्यास नक्कीच समाजहीत साधले जाईल अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापक सहादू मानकर यांनी व्यक्त केली.विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील गतिरोधक दूर करण्याचा प्रयत्न मोफत वह्यावाटप करुन केल्याचे मत जगन्नाथ सिन्नरकर यांनी व्यक्त केले.सिन्नरकर कुटुंबीयांच्या या सामाजिकतेचे लोणावळा परिसरात कौतूक होत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!