ताज्या घडामोडी

तालुक्यातील निम्मे कोरोना रुग्ण हे तळेगाव हद्दीत ; परंतु प्रतिबंधात्मक उपायांची वाणवा 

तळेगाव : मावळ तालुक्यात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या तळेगाव दाभाडे शहरात प्रशासन आणि नागरिकांना अजूनही गांभीर्य नसल्याचे चित्र रविवारच्या आठवडी बाजारात दिसत आहे. गेल्या दोन दिवसात तालुक्यात आढळलेल्या 448 कोरोना रुग्णांपैकी 61टक्के म्हणजेच 280 रुग्ण तळेगाव मधील आहेत.तर तालुक्यात सध्या सक्रिय असलेल्या 1104 रुग्णांपैकी 541 रुग्ण म्हणजे जवळपास 50 टक्के रुग्ण तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील आहेत.

तळेगाव परिसरात वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तातडीच्या कामाशिवाय तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर 17 जानेवारीपासून शहराच्या एन्ट्री पॉईंटवर नाकाबंदी करून लसीचे 2 डोस घेतलेल्यांना शहरात प्रवेश मिळणार अशा बातम्या प्रसारित झाल्या होत्या.

नवीन निर्बंध आल्यावर पहिले दोन दिवस ध्वनिक्षेपकावरून जनजागृती करत नियमांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले .मात्र सध्या या सगळ्याचा विसर पडल्याचे चित्र दिसत आहे. रविवारच्या आठवडी बाजारात येणा-या विक्रेत्यांनी लस घेतली आहे का? त्यांच्याकडून मास्कचा वापर होतो का? याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.लसीकरणासंदर्भात विक्रेत्यांना विचारणा केली असता काहींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नगरपरिषद कर्मचारी या ठिकाणी पाहणी करण्यासाठी फिरकलेही नाहीत. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना फक्त कागदावरच आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विक्रेत्यांसह अनेक नागरिक बाजारातील गर्दीत विनामास्क फिरताना दिसतात.त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय प्रत्यक्षात आणणे गरजेचे आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!