ताज्या घडामोडी

कोरे गावाला चक्रीवादळाचा तडाखा ; मच्छीमारांच्या नौकांचे नुकसान

कोरे : काल शनिवारी रात्री 2 वाजण्याच्या दरम्यान झालेल्या चक्रीवादळाने कोरे गावातील 3 मच्छीमार नौकांचे नुकसान झाले आहे .

येथील केसरीनाथ तांडेल यांची निरंत नौका, रवींद्र तांडेल यांची विजय साई नौका, गणेश तांडेल यांची पंचमुखी कुलस्वामिनी नौका या नौका बुडून नौकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.इंजिन मध्ये पाणी गेल्याने इंजिन निकामी झाले असून बोटीचे फॅन तुटून गेले आहेत.

मे महिन्यात तौक्ते वादळाचा कोरे गावातील मच्छीमार नौकांना फटका बसला होता.सततची वादळे यामुळे मच्छीमार समाज हतबल झाला आहे.कोरे गावाला चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने झालेल्या नुकसानीची मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मच्छिमार बांधवांनी केली आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!