ताज्या घडामोडी

मोठी बातमी ! राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे.त्यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानातील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पवार यांची चाचणी करण्यात आली मात्र ती निगेटिव्ह आली होती.

गेल्या काही दिवसात वेगवेगळ्या सामाजिक कामाच्या निमित्ताने पवार यांचा राज्यभरात विविध ठिकाणी दौरा झाला. यादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

शरद पवार यांनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिली. माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून लक्षणे सौम्य आहेत. काळजी करण्यासारखे काही नाही,असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्यावर सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. आपल्या संपर्कात गेल्या काही दिवसात आलेल्या व्यक्तींनी तपासणी करावी असे पवार त्यांनी ट्विट मध्ये आवाहन केले आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!