ताज्या घडामोडी

आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

तळेगाव : आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी रवींद्र पंढरीनाथ काळोखे यांनी तळेगाव पोलिसांकडे केली आहे.गुंतवणूक करण्यास सांगून वीस लाखांची फसवणूक केल्या बाबत काळोखे यांनी तक्रार अर्ज दिला.

तक्रारदारांची संघवी यांच्याशी ओळख झाली. संघवी यांनी काळोखे यांना रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितलं. संघवी यांचे वर्तन विश्वासार्ह वाटल्याने काळोखे यांनी वीस लाख रुपये गुंतवले.परंतु गुंतवलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता काळोखे यांना वाटेना.त्यातच संघवी यांनी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ललित गांधी हे माझे साडू आहेत. त्यांच्या खूप ओळखी आहेत त्यामुळे तुम्हाला काय करायचे ते करून घ्या’ अशी धमकी दिली असे तक्रार अर्जात म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी काळोखे यांनी केली आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!