ताज्या घडामोडी

च-होली येथे मुलाणी मस्जिद प्रांगणात ध्वजारोहण

चिंचवड  : 73 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त चर्‍होली येथील मुलाणी मस्जिदच्या प्रांगणात, अहेले सुन्नत्वल जमात मुलाणी मस्जिद व मौलाना आझाद सोशल फाउंडेशन या संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सर्व प्रथम प्रा. बी.एन.चव्हाण यांनी संविधान उद्देशीकेचे वाचन व शपथ घेतली. ह.भ.प.भानुदास महाराज यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले. ध्वजारोहन माजी महापौर नितीन आप्पा काळजे व पंडित तात्या तापकीर ह्यांच्या हस्ते पार पडला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाँडेशनचे अध्यक्ष महमंदशरिफ मुलाणी यांनी केले. सुत्रसंचालन सिराज मुलाणी यांनी केले.

प्रमुख उपस्थिती सुवर्णाताई बुर्डे विद्यमान नगरसेविका, ज्योतीताई तापकीर, नरेंद्र (बंटीशेठ) तापकीर, सचिनशेठ दाभाडे (अध्यक्ष संतकृपा प.संस्था), ह.भ.प.अशोक महाराज ढोरजे, प्रभाकर ढोरजे, बापुसाहेब तापकीर (शंभुराजे आखाडा), बाळासाहेब जाधव (शिवसेना नेते), प्रविणशेठ चोरडिया (मा.ग्रा.पं.सदस्य), श्रीकांत आण्णा, युवा नेते तापकीर, गुलाबराव ताम्हाणे (सामाजिक कार्यकर्ते) इतर ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रफिकभाई इनामदार, मुबारक पठाण, रहिमानभाई शेख, पठाण सर, याशिन शेख, जुल्लुभाई पानसरे, मौलाना नाजिम अख्तर साहेब यांनी आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!