ताज्या घडामोडी

प्रसिद्ध लेखक व सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे निधन

पुणे : प्रसिद्ध लेखक व सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे दीर्घ आजाराने आज सकाळी राहत्या घरी निधन झाले. ते 77 वर्षांचे होते.

त्यांच्या पश्चात विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा आणि मोठा मित्र परिवार आहे. दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासबत त्यांनी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली.

केवळ साहित्यविश्वातच नाही तर समाजातही त्यांनी आपली ओळख निर्माण केली.अनिल अवचट यांचा जन्म पुण्यातील ओतूरमध्ये झाला . त्यांनी एमबीबीएसची पदवी बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली.महाविद्यालयीन जीवनात त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. पत्रकार म्हणून त्यांनी अनेक विषयांवर आपली मते मांडली. शिल्पकला, चित्रकला, फोटोग्राफी आणि ओरिगामी यातून विविध चित्र साकारण्याचा त्यांचा आवडता छंद होता.

डॉ. अनिता आणि अनिल अवचट यांच्या व्यसन क्षेत्रातील कार्याचा वसा या पुढे सुद्धा असाच चालू राहील असे मुक्तांगणचे अध्यक्ष डॉ. आनंद नाडकर्णी यांनी शोकसंदेशात सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!