लोणावळ्यातील मास्टर विक्रम बोभाटे यांना अभिमान महाराष्ट्राचा पुरस्कार प्रदान
लोणावळा : लोणावळ्यातील तायक्वांदो प्रशिक्षक मास्टर विक्रम बोभाटे यांना अभिमान महाराष्ट्राचा हा जीवनगौरव पुरस्कार २०२१-२२ चा पनवेल, मुंबई येथे मिळाला. क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आले.
डायनॅमिक युथ स्पोर्ट अँकेडमी, भारत या संस्थेकडून सदरचा पुरस्कार अभिनेञी रसिका बेंगलुरूकर यांचे हस्ते देण्यात आला. यावेळी आर्जून पुरस्कार विजेता भारतीय हाॕकी प्लेअर , अर्जून पुरस्कार विजेता एलिजा नेल्सन तसेच महाराष्ट्राच्या हास्य जञा फेम कलाकार शशिकांत केलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मास्टर विक्रम बोभाटे हे लोणावळ्यातील तायक्वांदो पटू व तायक्वांदो प्रशिक्षक आहेत. त्यांनी आजपर्यत तायक्वांदोचे हजारो विद्यार्थी घडविले आहेत. देश व जागतीक पातळीवर त्यांच्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. माफक दरांमध्ये मुला मुलींना कराटे प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना अभिमान महाराष्ट्रांचा हा पुरस्कार मिळाल्यानेे लोणावळा व मावळ परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. लोणावळा शहरासाठी हा मानाचा तुरा आहे.