ताज्या घडामोडी

ढिम्म प्रशासनाला कंटाळून बॅरिकेट्स लावत शिंदेगाव ग्रामस्थांकडून अवजड वाहतूकीला अटकाव 

तळेगाव : अवजड वाहनांच्या वाहतुकीचा त्रास आणि ढिम्म प्रशासन याला कंटाळून शिंदे गावातील ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव करून बॅरिकेट्स बसवत अवजड वाहतुकीला अटकाव केला आहे.

मावळ व खेड एमआयडीसी यांना जोडणारा हा मुख्य रस्ता शिंदे गावातून जातो. एमआयडीसीतील कंपन्या आणि इतर वाहतूक याच मार्गाने होते. कंपनीतील ट्रेलर्स, टेम्पो, ट्रक तसेच इतर अवजड वाहनांमुळे रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यांवरील खड्डे आणि अवजड वाहने यामुळे अनेकदा होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी ग्रामस्थांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांनी 26 जानेवारी रोजी घेतलेल्या ग्रामसभेत बॅरिकेट बसवण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करून शिंदे गावात बॅरिकेट्स लावत अवजड वाहतुकीला बंदी केली आहे.  प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही प्रशासन सोयिस्करपणे याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे यातून प्रशासनाने चांगला मार्ग काढला आणि पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिल्यास हा रस्ता मोकळा करू असे शिंदे गावचे सरपंच सचिन देवकर यांनी आवाज न्यूजशी बोलताना सांगितले.

 

 

 

 

 

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!