ताज्या घडामोडी

रोटरी क्लबच्या वतीने ४२५ खाण कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

तळेगाव : रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सी तर्फे मंगरूळ येथील खाण कामगारांसाठी दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी केली जाते. सालाबाद प्रमाणे याही वर्षी ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मंगरूळ येथील ४२५ खाण कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी तर्फे आयोजित करण्यात आले.

या आरोग्य तपासणी चे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सी चे संस्थापक अध्यक्ष रो .संतोष खांडगे व रो. गणेश काकडे यांच्या शुभहस्ते झाले.यावेळी रोटरी अध्यक्षा सुमती निलवे रो. प्रवीण भोसले रो. मिलिंद शेलार रो.सचिन कोळवणकर रो. सुदाम दाभाडे रो. अजय पाटील रो. विलास टकले, रो. रवी दण्डगव्हाळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी या खाण कामगारांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत टी-टी लस देण्यात आली. याप्रसंगी बोलताना संस्थापक अध्यक्ष रो. संतोष खांडगे यांनी, उपजिविकेसाठी कष्ट उपसताना खाण कामगारांकडून स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते ही गोष्ट लक्षात घेऊन या शिबिराचे प्रयोजन केल्याचे सांगितले व covid-19 च्या आपत्ती काळामध्ये खाण-कामगारांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे नियोजन रो विल्सेन सालेर व प्रकल्प प्रमुख रो. डॉ विजय इंगळे यांनी केले तर आभार रो . दशरथ जांभूळकर यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!