ताज्या घडामोडी

कै. बाळासाहेब गद्रे स्मृती नाट्यवाचन स्पर्धेत शिक्षक गटात ‘मंगल्या, तर खुल्या गटात ‘सोडवणूक’ प्रथम

तळेगाव : कलापिनी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. बाळासाहेब गद्रे स्मृती नाट्यवाचन स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धेचे उद्घाटन डॉ.मिलिंद निकम,श्री.राजेश बारणे आणि श्री.विश्वास देशपांडे यांनी केले आणि शुभेच्छा दिल्या.

पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळी अभिनेत्री मैथिली वारंग, लेखक – दिग्दर्शक प्रशांत सुर्वे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, विलास काळोखे, कलापिनीचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर, कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे, श्री. श्रीशैल गद्रे,परीक्षक राजेंद्र पाटणकर, डॉ. सुहास कानिटकर, ज्योती गोखले, कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिक्षक गटाचे परीक्षण ज्योती गोखले, राजेंद्र पाटणकर, विराज सवाई यांनी केले. खुल्या गटाचे परीक्षण डॉ सुहास कानिटकर ज्योती गोखले, राजेंद्र पाटणकर यांनी केले.कलापिनी चे अध्यक्ष विनायक अभ्यंकर यांनी स्वागत केले आणि स्पर्धेला पुणे जिल्ह्या बाहेरहून पण बऱ्याच स्पर्धकांनी विचारणा केल्या मुळे पुढील वर्षी .राज्य पातळीवर स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रयत्न करू असे सांगितले. स्पर्धेत तळेगाव, चाकण,पिंपरी चिंचवड आणि पुणे विभागातून ३५ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे हे सोळावे वर्ष होते.

अभिनेत्री मैथिली वारंग म्हणाल्या, ‘ नाट्यवाचन स्पर्धा खूप आव्हानात्मक असतात. वेशभूषा, रंगभूषा, नेपथ्य या सगळ्या शिवाय ते पात्र उभं करण सोपं नाही. अशा स्पर्धा आयोजित केल्याबद्दल दोन्ही संस्थाचं अभिनंदन.’

प्रशांत सुर्वे म्हणाले, ‘ निम शहरी भागात इतक्या दर्जेदार स्पर्धा घेतल्या जातात हे पाहून आनंद झाला. आपल्यातील गुणवान कलाकारांना आगामी चित्रपटात मध्ये नक्कीच संधी देईन.’

सुरेश धोत्रे यांनी आपण नक्कीच या स्पर्धा राज्यपातळीवर आयोजित करू त्यासाठी अ.भा.म.नाट्य परिषद सर्व प्रकारचे सहाय्य करेल असे सांगितले . विलास काळोखे यांनी स्पर्धकांचे अभिनंदन केले .परीक्षक राजेंद्र पाटणकर यांनी आपल्या मनोगतात कलापिनीने नाट्यवाचन कार्यशाळा आयोजित करावी असे सांगितले.

डॉ. विनया केसकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ अनंत परांजपे यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे यांनी आभार मानले. चेतन पंडित, शार्दुल गद्रे चैतन्य जोशी, रश्मी पांढरे, अनघा बुरसे, अनिरुद्ध जोशी, स्वच्छंद गंदगे, सायली रौंधळ, प्रणव केसकर, दीपक जयवंत, दीप्ती आठवले, श्रीपाद बुरसे, ज्योती ढमाले श्री देशमुख यांनी संयोजन केले.

स्पर्धेनंतर परिसंवाद आयोजित करण्यात आला तसेच स्पर्धकांनी मनोगत व्यक्त केले आणि उत्तम संयोजना बद्दल समाधान व्यक्त केले.शिक्षक गट आणि खुला गट अशा दोन गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
शिक्षक गट –
सांघिक
प्रथम – साईनाथ बालक मंदिर, – मंगल्या
द्वितीय – एफ,सी.टीचर्स – मनशांती
तृतीय – जैन इंग्लिश स्कूल -१०० वर्ष
उत्तेजनार्थ –
सह्याद्री इंग्लिश स्कूल – आकांक्षा क्लब
DIC’s इग्लिश स्कूल – आनंदी सहल
मनोरम प्राथमिक शाळा चिंचवड – ईश्वरसाक्ष
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, चाकण – संविधान

वाचिक अभिनय स्त्री
प्रथम – धनश्री कांबळे / वैभवी तेंडूलकर
द्वितीय – चित्रा देशपांडे
तृतीय – अनघा कुलकर्णी
उत्तेजनार्थ – ममता प्रजापती
उत्तेजनार्थ – संध्या गाडे

वाचिक अभिनय पुरुष
प्रथम – अंकुर शुक्ल
द्वितीय – तुषार देशमुख

दिग्दर्शन –
प्रथम – वैभवी तेंडूलकर
द्वितीय – अंकुर शुक्ल
तृतीय – हर्षा जोशी

लेखन प्रोत्साहन विशेष पारितोषिक
चित्रा देशपांडे
खुला गट –
सांघिक
प्रथम – कलाकंड , पुणे – सोडवणूक
द्वितीय – नाट्यआरंभ, पुणे – एम्टीनेस
तृतीय – हास्ययोग आणि बालभवन दाभाडे – प्रेमपात्राचा घोटाळा
उत्तेजनार्थ – महाराष्ट्र कल्चरल सेंटर पुणे – बारा पस्तीस
उत्तेजनार्थ – रसरंग ग्रुप तळेगाव – भगवान श्री.सखाराम बाईंडर

दिग्दर्शन –

प्रथम – निखील जाधव

द्वितीय – मधुवंती रानडे

तृतीय – अक्षया कुलकर्णी
उत्तेजनार्थ – अश्विनी अंबिके
उत्तेजनार्थ – संदीप मन्वरे

वाचिक अभिनय स्त्री
प्रथम – कोमल पाटील
द्वितीय – अक्षया कुलकर्णी
तृतीय – गौतमी दातार
उत्तेजनार्थ – माधुरी कुलकर्णी
उत्तेजनार्थ – अर्चना भांडारकर

प्रथम – विजय कुलकर्णी
द्वितीय – रवींद्र पांढरे
तृतीय – तपन खळदकर
उत्तेजनार्थ –अमेय वडगावकर
उत्तेजनार्थ –जयदीप कुंभार
लेखन प्रोत्साहन विशेष पारितोषिक –
माधव जोगळेकर
समीर महाजन

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!