ताज्या घडामोडी
किरीट सोमय्यांवर हल्ला करणारे शिवसेना कार्यकर्ते पोलिसांसमोर हजर
पुणे : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर पुण्यात पुणे महापालिकेच्या परिसरात हल्ला करण्याचा प्रयत्न करणारे शिवसेनेचे कार्यकर्ते आज सकाळी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत.
शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, पदाधिकारी चंदन साळुंखे, किरण साळी, सुरज लोखंडे, रुपेश पवार, राजेंद्र शिंदे, सनी गवते यांच्यासह 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात शिवसैनिकांच्या अटकेच्या कारवाईला सुरुवात झाली आहे.या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्यकर्ते शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले आहे.
भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रशांत लाटे यांनी यासंदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोन दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला होता.